Rte Admission 2024-25 Maharashtra : खुशखबर मित्रांनो English School मध्ये RTE द्वारे मोफत Admission 16 मे 2024 गुरुवार रोजी पासून पुन्हा सुरु करण्यात आले.
RTE २५% Maharashtra योजना काय आहे ?
- आरटीई २५% या सरकारी योजने अंतर्गत लहान मुलांना खाजगी मोफत शिक्षण मिळते.
- RTE अंतर्गत जे खाजगी शाळेत सिलेक्ट झाले त्यांची ऍडमिशन फीस माफ होते.
- आरटीई २५% या योजनेत नर्सरी/जुनियर/सिनियर केजी,1 ली पासून ते 8 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळते.
Rte Admission 2024-25 Maharashtra Start Date
Rte Admission 2024-25 Maharashtra : मित्रांनो फेरब्रुवारी २०२४ मध्ये RTE २५% ने एक शासन निर्णय जारी केला होता त्यामध्ये पाल्याच्या १ किलोमीटर अंतरावर जर शासकीय / विनाअनुदानित शाळा म्हणजे जिल्हा परिषद ZP शाळा व खाजगी शाळे ऐवजी दुसरी शाळा असेल तर फॉर्म भरतांना इंग्लिश स्कुल म्हणजेच खाजगो शाळा सिलेक्ट करता येत नव्हते. या मुळे बालकांचे पालक खूप निराश झाले होते.
त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते आणि त्यामुळे English School मध्ये RTE द्वारे मोफत Admission साठी 16 मे 2024 गुरुवार रोजी पासून फॉर्म भरणे पुन्हा सुरु करण्यात आले.
Rte Admission 2024-25 Maharashtra Last Date
RTE 25% Admission Portal या वेबसाईट नुसार RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31/05/2024 पर्यंत राहील.
सूचना : अधिक माहिती साठी RTE २५% वेबसाईट अवश्य बघा.
RTE 25% 2024-2025 : Important Notice
- यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे.
- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.
पालकांकरीता सूचना (RTE 2024-2025)
Rte Admission 2024-25 Maharashtra :
- आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
- पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
- आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा.
- १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० शाळा निवडाव्यात.
- अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
- अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
- एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
- अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
- अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
- अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
- RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31/05/2024 पर्यंत राहील.
- दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
- सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
- सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
RTE 25% 2024-25 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ?
Rte Admission 2024-25 Maharashtra Apply Online : RTE २५% या पोर्टल वर ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरू शकता. इंग्लिश स्कूल मध्ये मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली RTE २५%ऍडमिशन लिंक आणि RTE फॉर्म कसा भरायचा ? या व्हिडिओ ची लिंक देण्यात येत आहे. तुमच्या मनात काही आणखी प्रश्न असतील येथे क्लिक करा.
“Rte Admission 2024-25 Maharashtra : खाजगी शाळेत RTE २५% द्वारे पुन्हा ऍडमिशन सुरु…” या पोस्ट बद्दल आणखी माहिती हवी असल्यास किंवा तुमच्या मनात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास कॉमेंट करा. या पोस्ट ला जास्तीत जास्त गरजवंत लोकांना शेयर ज्याने करून सर्व साधारण घरातील बाळ चांगली शिक्षा घेऊ शकेल.
RTE २५% बद्दल विचारले जाणारे प्रश्न । FAQ’s
आरटी फॉर्म कधी चालू होणार आहे?
English School मध्ये RTE द्वारे मोफत Admission साठी 16 मे 2024 गुरुवार रोजी पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.
RTE फॉर्म 2024-25 महाराष्ट्राची शेवटची तारीख काय आहे?
RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31/05/2024 पर्यंत राहील.
आरटीई महाराष्ट्रासाठी वयोमर्यादा किती आहे?
rte admission 2024-25 age limit in marathi : RTE २५% Admission 2024-2025 करीता वयोमर्यादा पुढील प्रमाणे राहील. आरटीई महाराष्ट्रासाठी वयोमर्यादा याचा शाशन निर्णय (GR) बघण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
आरटीई २५% साठी आवश्यक डॉक्युमेंट कोणती लागणार ?
RTE 25% Admission 2024-25 साठी आवश्यक डॉक्युमेंट कोणती लागणार या साठी खालील लिंक वर क्लिक करा.
Rte 25% Reservation For Academic Year 2024-25 ?
Rte Admission 2024-25 Maharashtra : Rte 25% Reservation सुधारित सूचना वाचण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
आरटीई हमीपत्र pdf कसे Download करावे ?
rte hamipatra 2024-25 in marathi : तुमच्या बालकाचे आरटीई २५% द्वारे खाजगी शाळेत नंबर लागला असेल तर आरटीई हमीपत्र हा फॉर्म भरून देणे खूप आवश्यक आहे.