PF Withdrawal In 3 Days News in Marathi
ज्यांनी पीएफ क्लेम फॉर्म भरला आणि १५ ते २० दिवस झाले अजून पीएफ जमा झाला नाही, आणि त्यामध्ये “३ दिवसात पीएफ जमा होणार” हि बातमी आलेली आहे. चला तर हि बातमी किती खरी आहे व याचे काय नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया.
३ दिवसात पीएफ ऍडव्हान्स कोणाचा जमा होणार?
PF Withdrawal In 3 Days News in Marathi : PF काढण्यासाठी आता फक्त ३ दिवस लागणार आहेत हि बातमी खरी आहे पण याचे नियम पुढील प्रमाणे आहे :
- पीएफ मेंबर चे एकाच PF ID मध्ये किमान ५ वर्ष म्हणजेच ६० महिने ड्युटी पाहिजे.
- पीएफ ऍडव्हान्स फॉर्म भरतांना Marriage / Higher Education / Construction of House या मधून एक कारण सेलेक्ट करावे लागणार.
- तुम्ही या अगोदर Marriage साठी पीएफ ऍडव्हान्स फॉर्म भरला असेल तर ते कारण तुम्ही पुन्हा सेलेक्ट करू शकत नाही, पुन्हा Marriage हे कारण दाखवून फॉर्म भरला तर फॉर्म रिजेक्ट होणार.
- या अगोदर वरील कारणांसाठी फॉर्म भरल्यास १५ ते २० दिवस लागायचे.
- आता EPFO ने वरील कारणांसाठी ऑटो मोड सेटलमेंट हि सर्व्हिस सुरु केली आहे त्यामुळे पीएफ ऍडव्हान्स ३ दिवसात जमा होणार.
१५ ते २० दिवसात पीएफ ऍडव्हान्स कोणाचा जमा होणार?
PF Withdrawal In 3 Days News in Marathi : अजूनही भरपूर लोकांचे पीएफ ऍडव्हान्स जमा होण्यासाठी १५-२० दिवस लागत आहे, त्याचे नियम पुढील प्रमाणे आहे :
- ज्यांचे एकाच PF ID मध्ये ५ वर्षापेक्षा कमी म्हणजेच ६० महिने पूर्ण ड्युटी नसेल त्याचा पीएफ ऍडव्हान्स बँक खात्यात जमा होण्यासाठी १५-२० दिवस लागतात.
- कारण त्यांचे Marriage / Higher Education / Construction of House हे कारण दाखवून फॉर्म भरता येत नाही.
- ५ वर्षापेक्षा कमी ड्युटी असते त्यांच्या साठी illness म्हणजेच आजार या कारणांसाठी पीएफ ऍडव्हान्स फॉर्म भरावा लागतो.
- वरील कारणासाठी ऑटो मोड सेटलमेंट मोड नसतो हे फॉर्म मॅन्युअल चेक केला जातो त्यामुळे पीएफ ऍडव्हान्स बँक खात्यात जमा होण्यासाठी १५-२० दिवस लागतात.
निष्कर्ष : ३ दिवसात पीएफ जमा होणार – कुठं पर्यंत खरी आहे बातमी ? (PF Withdrawal In 3 Days News in Marathi) हि बातमी खरी आहे पण याचे काही नियम आहेत. जर तुम्ही नियमात बसत असाल तर नक्कीच तुमचा पीएफ देखील ३ दिवसात जमा होईल अशी मी आशा करतो.
तर पीएफ मेंबर हि माहिती कशी वाटली ? तुमच्या जवळील व्यक्तीसोबत हि माहिती शेयर करा ज्याची तुम्हाला चिंता आहे. काही नवीन प्रश्न किंवा सूचनेसाठी कॉमेंट करा.
लिखाण : सलमान अत्तार
2018 पासून पीएफ क्षेत्रात कार्यरत.
(गुड लक मल्टिसर्व्हिसेस, चितेगाव)