Mofat Cycle Vatap Yojana Mharashtra 2023 : खुशखबर – या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल

Spread the love

Rate this post

Mofat Cycle Vatap Yojana Mharashtra : येथे आपण मोफत सायकल योजना काय आहे? किंवा सायकल अनुदान कोणाला मिळू शकते. आणि सोबतच Cycle Anudan PDF Form मिळेल.

ग्रामीण भागातील विद्यार्थी लांब शाळा असल्यामुळे त्यांना पायी दुसऱ्या गावी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी जावे लागते म्हणून खूप मुली आपले शिक्षण थांबून घेतात. त्यांच्या साठी खुशखबर आहे मुला-मुलीसाठी सरकारने एक योजना लागू केली आहे. सरकारने जिल्हा परिषदेच्या अतंर्गत चालू योजना २०२३ – २४ वर्षासाठी २०% टक्के कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागास वर्गीय मुलींना सायकल खरेदी साठी अर्थसहाय्यपुरवण्यात येते. अश्या प्रकारे मुलींना मोफत सायकल योजना राबवण्यात येत आहे.

नोट : या पोस्ट मध्ये आपण हिंगोली जिल्ह्यासाठी योजना बघत आहोत.

मोफत सायकल वाटप योजना । Mofat Cycle Vatap Yojana Mharashtra

महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव सायकल वाटप योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

मोफत सायकल योजना काय आहे? – Mofat Cycle Yojana Kay Aahe in Marathi

ग्रामीण विभागात म्हणजेच गावात शाळा गावापासून दूर असते, कधी २ किलोमीटर ते कधी ५ किलोमीटर. तर शाळा दूर असल्याने व जाण्यासाठी अडचणी मुळे बरेच विद्यार्थी शिक्षण घेणे सोडून देतात. असे होउ नये अशा उद्देशाने महाराष्ट्र शासन सायकल अनुदान – मोफत सायकल अनुदान योजना राबवून निवडीत विद्यार्थ्यांना सायकल देते या योजनेलाच मोफत सायकल योजना असे म्हणतात.

मोफत सायकल पात्रता काय आहे? – Mofat Cycle Yojana Eligibility in Marathi

  • जे विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात राहत असणारे रहिवासी आहे, व
  • इयत्ता 5वी ते 9वी या इयत्ते मध्ये शिकत असेल हे विद्यार्थी मोफत सायकल योजने साठी पात्र असतील.
  • विद्यार्थ्यांची शाळा त्याच्या घरापासून कमीत कमी २ किलोमीटर च्या अंतरावर असावी.
  • हि योजना DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे राबवण्यात येते त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर सायकल खरेदी करून त्याची किंमत व शाळेच्या प्रमाणपत्रासह प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली येथे सादर करावा लागतो.
  • या सर्व प्रोसेस नंतर विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये सायकल च्या किमती एव्हडी रक्कम किंवा जास्तीत जास्त 5000 रु पर्यंत ट्रान्सफर करण्यात येईल.
  • ज्याला सायकल पाहिजे तो/ ती विद्यार्थी : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभाजप, विमाप्र या प्रवर्गात असावा, यासाठी ग्रामपंचायत मधून सरपंच/ग्रामसेवक अथवा शाळेकडून जातीचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
  • लाभार्थी म्हणजेच विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील राहात असलेला रहिवासी असावा.

Mofat Cycle Vatap Yojana Mharashtra याबाबत अधिक माहिती तुम्हाला समाज कल्याण ऑफिस तसेच तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे मिळेल.

सायकल अनुदान योजनेचा FORM PDF

मोफत सायकल किंवा सायकल अनुदान मिळविण्यासाठी खालील नमुना अर्ज भरणे आवश्यक आहे.

मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला Mofat Cycle Vatap Yojana Mharashtra हि सरकारी योजना कशी वाटली? अश्याच मराठी अपडेट साठी आम्हाला कॉमेंट करायला आणि पोस्ट शेयर करायला विसरू नका.


Spread the love

Leave a Comment