Atal Pension Yojana in Marathi : या योजनेत ठराविक वयानंतर 5000 रुपये महिना मिळतो

Spread the love

5/5 - (1 vote)

Atal Pension Yojana in Marathi : येथे आपण या योजनेत कोनकोन गुंतवणूक करू शकतो. या योजनेचे Benifites काय राहील. या अटल पेंशन योजना 2023 या योजनेची योग्यता काय आहे, इत्यादी माहिती बघणार आहोत.

अटल पेंशन योजना काय आहे ? । Atal Pension Yojana in Marathi

अटल पेंशन योजना 2023: 1 जून 2015 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे अटल पेशन योजना चालू करण्यात आली होती. 60 वर्षाचे वय झाल्यानंतर Atal Pension Yojana या मध्ये पेंशन चालू करण्यात येते. या योजनेचा लाभ 18 वर्षा पासून ते 40 वर्ष असलेल्या लाभार्थ्यांना मिळेल. लाभ घेणाऱ्या व्यक्तींना या योजने मध्ये दर महा ₹1000 ते ₹5000 ची धनराशी दिली जाईल. पेंशन मध्ये मिळणारी धनराशी त्यांनी वयानुसार जमा केलेल्या इंस्टॉलमेंट वर निर्धारित केली जाते.

अटल पेन्शन योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • अटल पेन्शन योजना हि भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आली.
  • 60 वर्षांनंतर सर्व भारतीयांना दरमहा पेन्शनची हमी देण्यासाठी या योजनेची स्थापन करण्यात आली.
  • या योजनेचे लक्ष्य प्रामुख्याने गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत.
  • हे PFRDA द्वारे NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) या सिस्टम द्वारे कन्ट्रोल केले जाते.
  • या योजनेमध्ये तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर रु.1000 ते 5000 रु. प्रत्येक महिन्याला मिळेल याची हमी मिळते.
  • भारत सरकार केवळ पहिल्या 5 वर्षांसाठी ग्राहकांच्या योगदानाच्या 50% किंवा 1000 रु तुमच्या APY खात्यात जमा करणार.

अटल पेंशन योजनेचा गुंतवणुकीचा चार्ट

Atal Pension Yojana in Marathi : Contribution Chart PDF

येथे क्लिक करून चार्ट बघा.

अटल पेंशन या योजनेत कोन-कोन गुंतवणूक करू शकतो ?

Atal Pension Yojana in Marathi : सरकार ने Atal Pension Yojana मध्ये 60 वर्ष झालेल्या व्यक्तींना Guaranteed Pension Yojana चालू केली आहे. August 2021 पर्यंत 3 करोड 30 लाख लोकांनी या योजने मध्ये खाते उघडून या Pension योजनेचा चा लाभ घेतला आहे. एक 20 वर्षाचा  चा व्यक्ती दर महिन्याला फक्त 248 रुपये भरून 60 वर्ष झाल्यावर 5000 रुपये दर महिन्याला मिळवून आपले आपले आयुष्य आरामात जगू शकतो.

  • 18 ते 40 वर्ष असलेल्या व्यक्तींना Atal Pension Yojana मध्ये सहभागी होता येते.
  • या योजनेचे चार्ज PFRDA (Pension Fund Regulator & Development Authority) यांच्या कडे आहे.
  • Atal Pension Yojana हे असंगठीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रोजगारांना Social Security देण्याचे काम करतो.
  • Pension घेण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 20 वर्ष Invest करावे लागतील. तेव्हा तुम्हाला 60 वर्षाचे वय झाल्यावर याचा लाभ भेटेल.
  • ऑक्टोबर/01/2022 पासून आयकर भरणारे APY योजनेत अर्ज करण्यास पात्र नाहीत.

योजनेचे फायदे । Atal Pension Yojana Benefits in Marathi

  • आजीवन तुम्हाला दर महा Atal Pension Yojana ची रक्कम भेटेल.
  • Pension धारकाला काही कारणास्तव मृत्यू पावल्यास या Pension योजनेची रक्कम त्यांच्या पत्नीला ठरलेल्या नियमानुसार मिळेल.
  • जर wife नसेल तर nominee ला या योजनेचा 17 lakh to 8.5 lakh भेटेल.
  • सदस्य निवृत्ती वेतनाची रक्कम 1000/- ते 5000/- पर्यंत APY मध्ये Account open करतांनी ठरवू शकता.या योजने मध्ये एक हजार ते पाच हजार चा लाभ घेण्यासाठी Pension धारकाला 42/-RS. ते 210/-RS. दरमहा Account मध्ये टाकावे लागतील.

ATAL PENSION योजनेमध्ये लागणारे पुरावे ?

  • 18 ते 40 वय असलेले भारतीय नागरिक या योजनेत अर्ज करू शकतात.
  • आधार कार्ड हे त्याच्या प्राथमिक केवायसी साठी आवश्यक असेल.
  • अटल पेंशन योजनेचे फॉर्म भरतांना तुमच्या जवळ आधार कार्ड नसे तर आधार डिटेल्स नंतर Submit करू शकता.
  • सर्व बँक खातेधारक अटल पेंशन योजना मध्ये सहभागी होऊ शकतात.

ATAL PENSION YOJANA साठी फॉर्म कुठे भरावा?

तुमच्या जवळील CSC सेंटर / नेटकॅफे वर फॉर्म भरू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे माहिती असेल तर तुम्ही स्वतः https://enps.nsdl.com/eNPS/ApySubRegistration.html या लिंक वर क्लीक करून अटल पेंशन योजनेसाठी फॉर्म भरू शकता.

Q & A : प्रश्न उत्तरे

Atal Pension Yojana in Marathi Question and answers

EPF खाताधारक APY चे खाते उघडू शकतात का ?

  • हो उघडू शकतात. पहिल्या वर्षी APY हि योजना फक्त असंगठित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनाच भेटेल असे जाहीर करण्यात आले होते.
  • नंतर EPF खाताधारक APY चे खाते उघडू शकतात असे जाहीर करण्यात आले.

अटल पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी कमाल वय किती आहे?

आपण वयाच्या 18 ते 40 या वयामध्ये अटल पेन्शन योजनेत नोंदणी नोंदणी करू शकतो.


एखाद्या व्यक्तीकडे EPF आणि APY दोन्ही असू शकतात का?

EPF म्हणजे ज्यांचे प्रत्येक महिन्यात पीएफ कटतात ते अटल पेंशन योजना मध्ये नोंदणी करू शकता. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे EPF आणि APY दोन्ही असू शकतात.

Atal Pension Yojana in Marathi


अटल पेन्शन योजना योजनेसाठी कोण पात्र आहे?

तुम्ही भारतीय असणे आवश्यक आहे व तुमचे वय 18 ते 40 असेल तर तुम्ही अटल पेंशन योजनेसाठी पात्र आहात.

APY मध्ये काही विमा आहे का?

अटल पेंशन योजना (APY) या योजने मध्ये विमा मिळत नाही. हि योजना असंगठित कामगार म्हणजेच जे स्वतः छोटा मोठा व्यायसाय करतात त्याच्यासाठी आहे. या योजनेमध्ये त्याचे पैसे जमा करून त्याच्या म्हातारपणी ठराविक वयानंतर १००० ते ५००० रुपये महिन्याला मिळण्याची हमी आहे.

येथे क्लीक करून अटल पेंशन योजनेची पूर्ण माहिती वाचा

Atal Pension Yojana in Marathi अटल पेंशन योजनाची मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास आम्हाला कॉमेंट करा.


Spread the love

Leave a Comment