Sukanya Samriddhi Yojana in Marathi : येथे आपण Sukanya Samriddhi Yojana काय आहे ? व Sukanya Samriddhi Yojana Rate Calculator, पात्रता, कागपत्रे काय लागणार? अशी सुकन्या समृद्धी योजनाची सर्व माहिती बघणार आहोत.
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही एखाद्या मुलीचे आई किंवा वडील असाल तर ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा. आणि आपल्या मुलींच्या भविष्यासाठी विचार करा.
Sukanya Samriddhi Yojana काय आहे ? । सुकन्या समृद्धी योजना माहिती
- एक योजना आहे ज्याचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना आहे.
- ही एक भारत सरकार (सेंट्रल गवर्नमेंट) ची योजना आहे.
- या सरकारी योजना मध्ये पैसे भरले तर मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना फायद्याची आहे.
- मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षापर्यंत या योजनेमध्ये अर्ज करता येतो.
- या योजनेचा कालावधी एकूण 21 वर्षाचा असतो.
- तुम्हाला फक्त सुरुवातीच्या 14 वर्षापर्यंतच पैसे भरावे लागतात.
- या योजनेमध्ये तुम्हाला 7.6% व्याजदर देण्यात येतो
- तर मित्रांनो यामध्ये मॅच्युरिटी रक्कम म्हणजे तुम्हाला मिळणारी रक्कम डायरेक्ट 3 पट होते.
Sukanya Samriddhi Yojana Rate Calculator
मित्रांनो तुम्हाला या सुकन्या समृद्धी योजनेचा गुंतवणीचा अंदाज घ्यायचा असेल तर पुढील स्टेप वाचा आणि करून बघा…
- गुगलमध्ये Sukanya Samriddhi Yojana Calculator The Economic Times असे सर्च करा किंवा या पोस्टमध्ये सर्वात खाली लिंक दिलेली आहे तेथे क्लिक करा.
- द इकॉनोमिक टाइम से कॅल्क्युलेटर ओपन होईल.
- तिथे तुम्हाला हाऊ मेनी गर्ल्स चिल्ड्रन डू यू हॅव असा प्रश्न विचारण्यात येईल म्हणजे तुमच्या घरात किती मुली आहे ते सिलेक्ट करा एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिकही सिलेक्ट करू शकता.
- मुलीचे वय टाका.
- आता येथे तुम्हाला वर्षाला किती रुपये भरायचे आहे ते टाका.
- कॅल्क्युलेट बटन दाबा
- आता येते तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार ते दिसेल.
सुकन्या समृद्धी योजना कशी सुरू करावी?
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. हो मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे.भारताचे रहिवासी असावे.
सुकन्या समृद्धी योजना कागदपत्रे?
ही योजना सुरू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार ? हा प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल तर पुढील प्रमाणे कागदपत्र लागणार. जसे:
- मुलीच्या डॉक्युमेंट्स मध्ये : जन्म दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
- पालकाच्या डॉक्युमेंट मध्ये : आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
- पत्त्याच्या पुराव्यासाठी कोतेहेही एक : ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट/ विज बिल किंवा रेशन कार्ड.
सूचना : मित्रांनो अजून व्यवस्थित माहिती साठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये किंवा आपल्या गावातील किंवा शहरातील पोस्टमन ला भेट द्या.
मित्रांनो पोस्ट पेमेंट बँक या बँकेतून जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय होईल तेव्हा सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू होऊन जाईल तुम्ही महिन्याप्रमाणे किंवा वर्षाला एकदा याचे पैसे भरू शकता. अधिक माहिती साठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये विचारपूस करा. धन्यवाद
सुकन्या समृद्धी योजना [प्रश्न ऊत्तरे ] । Sukanya Samriddhi Yojana Q & A
सुकन्या समृद्धी योजनेसाठी किती वर्षे भरावे लागतील?
सुकन्या समृद्धी योजनेसाठी १४ वर्षे पैसे भरावे लागतात. तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये याची सविस्तर माहिती घेऊ शकता.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते?
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या जन्मापासून १० वर्षा पर्यंत खाते उघडता येते.
आपण SSY खाते ऑनलाइन उघडू शकतो का?
सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY Online उघडता येत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अधिकृत बँक किंवा जवळील पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्यावी लागते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलाचे आधार कार्ड अनिवार्य आहे का?
हो मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलाचे आधार कार्ड अनिवार्य आहे.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी फोटो आवश्यक आहे का?
सुकन्या समृद्धी योजनेसाठी फोटो आवश्यक आहे कारण जेव्हा आपण या योजनेसाठी अर्ज करतो तेव्हा आपल्याला फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये लावण्यासाठी व सोबतच तुम्हाला पैसे जमा करण्यासाठी पासबुक देण्यात येते त्यावर देखील फोटो लावणे आवश्यक आहे.
Sukanya Samriddhi Yojana या सरकारी योजनेशी संबंधित तुमचे काही प्रश्न किंवा काही सूचना असल्यास आम्हाला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका. हि योजना कामाची वाटली असेल तर आपल्या आवडत्या मित्र आणि नातेवाईकांना खालील व्हाट्सअँप बटन वर क्लीक करून शेयर करा.