4 Easy Way : How to Check PF Online | 4 प्रकारे पीएफ चेक करायला शिका – फक्त 2 मिनिटात

Spread the love

5/5 - (1 vote)

How to Check PF Online : आपण SMS पाठवून / टोल फ्री नंबर वर मिस्ड कॉल देऊन ऑफलाईन तसेच  EPFO च्या PF Passbook किंवा Umang App वर ऑनलाईन पीएफ चेक कसा करायचा या बद्दल आपण या पोस्ट मध्ये माहिती बघणार आहोत.

PF Check Kasa karaycha ?

PF Check in Marathi : मित्रांनो पैसे देऊन पीएफ चेक करायची गरज नाही, आता या 4 सोप्या प्रकारे करा पीएफ चेक करायला शिकून घ्या. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर प्रत्येक महिन्याच्या पगार नंतर आपल्याला या महिन्यात आपला किती पीएफ जमा झाला कि नाही? हे माहिती करून घेण्याची उत्सुकता असते. पण कामामुळे किंवा काही दुसऱ्या कारणाने आपले जवळील नेटकॅफे किंवा CSC सेंटर वर जाऊन पीएफ चेक करायला वेळच मिळत नाही. तर आता तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल वर खाली दिलेल्या ४ प्रकारे अगदी सहज पीएफ चेक करू शकता.

How to Check PF Online in Marathi

आता या 4 प्रकारे पीएफ चेक करणे सोप्पे झाले आहे.

How to Check PF in Marathi : तुमचा ठेकेदार किंवा HR तुमचा पीएफ नियमित भरतो कि नाही हे कुणालाही विचारायची गरज नाही तुम्ही स्वतः खालील ४ प्रकारे PF Check करू शकता, ते कसे चेक करावे हि सर्व माहिती Marathi भाषेत आहे.

  • SMS पाठवून पीएफ चेक करू शकता.
  • टोल फ्री नंबर वर मिस्डकॉल देऊन पीएफ चेक करू शकता.
  • EPFO च्या PF Passbook वर ऑनलाईन पीएफ चेक करू शकता.
  • EPFO च्या Umang या अँप वर देखील ऑनलाईन पीएफ चेक करू शकता.

SMS पाठवून पीएफ चेक कसा करायचा ?

pf balance check number sms एसएमएस पर्याय :  तुमचा मोबाईल नंबर EPFO मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल नंबरने 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN लिहून मॅसेज सेंड करायचा आहे. या मध्ये UAN ठिकाणी तुमचा १२ अंकी UAN नंबर लिहायचा आहे. SMS पाठवून झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक मॅसेज येईल त्यामध्ये तुमच्या पीएफ खात्यात किती शिल्लक पीएफ आहे व इतर माहिती मिळेल.

टोल फ्री नंबर वर मिस्डकॉल देऊन पीएफ चेक कसा करावा ?

pf missed call number पीएफ चेक नंबर : तुमच्या PF मध्ये रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरने 9966044425 वर मिस्डकॉल द्यायचा आहे, मिस्ड कॉल देऊन झाले कि रिंग वाजल्यानंतर कॉल आपोआप कट होईल आणि थोड्याच वेळात तुम्हाला EPF मध्ये पीएफ किती शिल्लक आहे व पीएफ खात्याशी संबंधित बाकीची माहिती SMS च्या स्वरूपात मिळेल.

EPFO च्या PF Passbook वर ऑनलाईन पीएफ चेक कसा करायचा ?

pf passbook check online : ऑनलाईन पीएफ चेक करण्यासाठी तुमचे UAN नंबर ऍक्टिव्हेट असणे आवश्यक आहे. तुमचा UAN नंबर ऍक्टिव्हेट असेल तर त्याचा पासवर्ड मिळेल. । How to Check PF Online on PF Website

  • EPFO PF Passbook हि वेबसाईट ओपन करा.
  • १२ अंकी UAN नंबर व पासवर्ड टाईप करा.
  • कॅप्चा टाईप करा व लॉगिन करा.
  • तुम्हाला जो पीएफ बघायचा तो PF मेंबर आयडी सिलेक्ट करा. 

अशा प्रकारे तुम्ही Online PF Check करू शकता.

Umang अँपवर ऑनलाईन पीएफ कसा चेक करायचा ?


Umang अँपने ऑनलाईन पीएफ चेक करण्यासाठी तुमचे UAN नंबर ऍक्टिव्हेट असणे आवश्यक आहे. । How to Check PF Online using Umang App ? । check pf balance using umang

  • Umang अँप मोबाईल मध्ये इंस्टाल करा.
  • Umang अँप मध्ये रजिस्टर करून लॉगिन करा.
  • अँप मध्ये EPFO लिहून सर्च करा.
  • PF Passbook वर क्लीक करून १२ अंकी UAN नंबर टाका.
  • Get OTP बटन वर क्लीक करा.
  • तुमच्या PF मध्ये रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर ६ अंकी OTP येईल तो भरा.
  • तुमच्या पीएफ मधील मेंबर आयडी दिसतील तुम्हाला जो पीएफ बघायचा ते नाव सिलेक्ट करा.
  • यामध्ये पीएफ बैलेंस पासबुक डाऊनलोड करू शकता. तर अशा प्रकार खूप सोप्या प्रकारे Umang अँपवर ऑनलाईन पीएफ चेक करू शकता.

mahayojna.co.in या ब्लॉग वरील How to Check PF Online in Marathi हि पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा, तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला कॉमेंट करा.


Spread the love

Leave a Comment