Personal lone कर्ज घेत असाल तर सावधान या गोष्टी जाणून घ्या नाहीतर येऊ शकतात अडचणी
bank charges for personal lone
कोणतेही लोन घेताना या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही personal lone नाही तर दुसरे कोणतेही कर्ज घेतले तर त्या आधी काही माहिती असणे आवश्यक आहे .हे कर्ज सहज का उपलब्ध होतं कारण फार कमी कागदपत्राच्या आधारावर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मंजुरी मिळते .म्हणून अचानक गरज पडल्यावर हे कर्ज उपलब्ध होतं.
मित्रांनो आपण कर्ज प्रक्रिया शुल्क का कसे आकारतात ते जाणून घेऊ…..
कर्ज मिळवण्याची प्रक्रिया आणि ती मंजूर होण्यासाठी बँकेला काही खर्च करावा लागतो .यासाठी ते आपल्याकडून सुरुवातीला शुल्क आकारतात कर्ज प्रक्रिया शुल्काची किमान आणि कमाल प्रत्येक बँक सेट करत असते. आणि लक्षात घ्या की प्रक्रिया शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळ्या असतात. Personal कर्जामध्ये कर्ज प्रक्रिया शुल्क एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.5% ते 2.50% पर्यंत असते.
बँक कर्जदाराकडून पडताळणी शुल्क आकारते…..
कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँकेला कर्जाच्या व्यवहाराची माहिती घ्यावी लागते. आणि कर्जदाराच्या व्यवहाराची सगळी माहिती काढण्यासाठी त्यांना वेगळी टीम तयार करावी लागते .मग ही टीम ग्राहकाचा व्यवहार तपासते .तसेच त्याने भूतकाळात गिरीतेने कर्जाचे फेड केली की नाही हे तपासते. या सर्व कामासाठी या प्रक्रियेसाठी बँक कर्जदाराकडून processing fee म्हणजेच प्रक्रिया शुल्क आकारते.
जीएसटी कर स्वरूपात शुल्क आकारले जाते…..
जीएसटी च्या स्वरूपात ग्राहकाला शुल्क भरावे लागते. ते अशासाठी की कर्ज मंजुरी किंवा परतफेडच्या कालावधीत कोणत्याही सेवेची आवश्यकता लागते .त्यासाठी त्याला जीएसटी स्वरूपात शुल्क भरावे लागते. बाउन्स झाला तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते.
EMI बाउन्स स्वरूपात शुल्क….
मित्रांनो वेळेवर EMI पेमेंट करण्यासाठी आपल्याला खात्यात पुरेसा पैसा ठेवावा लागतो .जर पुरेसा निधी नसेल तर ईएमआय बाउन्स होतो. मग EMI उशिरा भरावा लागतो तेव्हा बँक दंडात्मक कारवाई करू शकते.
कर्ज घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा.
- काही वेळा कर्जाशी संबंधित विविध छुपे शुल्क असू शकतात .परतफेड चे वेळापत्रक आणि त्यात समाविष्ट शुल्कासह सर्व तपशील समजून घ्या.
- कर्जदाराने अटी व शर्ती आणि गोपनीयता धोरणाचे काळजीपूर्वक वाचन करून ते समजून घ्यावे .
- सणासुदीच्या काळात बँकेचे वेगवेगळे फायदे असतात.
- सणासुदीच्या काळात बँक होम लोनवर सोन्याचे किंवा चांदीचे नाणे अशा प्रकारचे काही बक्षीस ऑफर करतात .परंतु यात फसण्यापूर्वी व कर्जासाठी लागणारी फी आणि कालावधी आणि व्याज जाणून घ्या.
- विविध कालावधीसाठी व्याजदर तपासा आणि योग्य ते कर्ज निवडा……